गोपराजू रामचंद्र राव उर्फ गोरा यांची ईश्वरावर श्रद्धा नव्हती. त्यामुळे गांधी वर्तुळात गोरा काही प्रमाणात अस्वीकारार्ह होते…
हे पुस्तक म्हणजे चार वर्षांपेक्षा कमी अवधीमधील गांधीजींसोबतचा व्यक्तिगत संपर्क आणि पत्रव्यवहाराची कहाणी आहे. अपरिचित आणि काहीसे नकोसे वाटणारे गोरा, गांधीजींचे निकटवर्तीय होऊन त्यांच्या ‘कुटुंबाचे’ प्रिय सदस्य कसे बनले आणि गोरांच्या नजरेतील महान राष्ट्रीय नेते गांधीजींचे रूपांतर व्यक्तिगत संबंधात होऊन ते उच्च नैतिक पातळीचे गुरू कसे बनले आणि आदर अधिकाधिक वृद्धिंगत कसा झाला, या संबंधी हे पुस्तक आहे.......